पोंभुर्णा आठवडी बाजारात पाणपोई सुरु #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
पोंभुर्णा:- स्व. श्रीनिवास आत्राम यांचे स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा पोंभुर्णा येथे आठवडी बाजारात अल्का आत्राम यांचे वतीने पाणपोई सुरु करण्यात आली.
कडक उन्हाळ्यात गाव खेड्यातून लोक बाजारात येतात. त्या रखरखत्या उन्हात थंड पाणी म्हणजे शरीराला तहान भागवण्यासाठी लोक भटकंत असतात त्यात ही पाणपोई म्हणजे तहान भागवण्याचं काम करते.

माझे वडील खूप हळव्या मनाचे होते. ते पण होइल ती मदत करण्यात पुढे असायचे त्यामुळे त्यांच्या आठवणीत दरवर्षी मी ही पाणपोई लावते नक्कीच त्यांचा आशिर्वादामुळे मी लोकांच्या सेवेचे काम करू शकते असे अल्का आत्राम यांनी सांगितले. यावेळी अल्का आत्राम, नगराध्यक्ष सुलभा पिपरे, महेश रणदिवे नगरसेवक, उषा गोरंतवार नगरसेविका, गुरूदास पीपरे उपस्थित होते.