खासदार बहिणीसमोरचं भावाचा राडा; कोळसा खाण अधिकाऱ्यांना शिवीगाळ? #Chandrapur #bhadrawati

Bhairav Diwase
0

खासदार प्रतिभा धानोरकर काय म्हणाल्या......

चंद्रपूर:- चंद्रपूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर समोरच त्यांच्या सख्खा भावाने आणि कार्यकर्त्यांनी खासगी कोळसा खाणींच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ केलेली आहे. त्याचबरोबर मारहाणीचा प्रकार सुध्दा घडलेला आहे. विशेष म्हणजे शिवीगाळ करण्यात खासदार यांचे सख्खे भाऊ प्रविण काकडे हे आघाडीवर होते. शिवीगाळ व मारहाण केल्याचा गंभीर प्रकार घडलेला आहे. नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर निवडून येताच भावाने पराक्रम केल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आलेला आहे.
चंद्रपूर लोकसभेच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचा हा पुर्वीचा विधानसभा मतदारसंघ आहे. भद्रावतीमध्ये कर्नाटक एम्टा नावाची कोळसा घाण आहे. जी कर्नाटक सरकारच्या अधिपत्याखाली आहे. या खाणी बाबत काही प्रश्न होते. समस्या होते. त्या प्रश्नांना व समस्या घेऊन खासदार तिथे व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी गेल्या होत्या. सोबत त्यांचे भाऊ प्रविण काकडे, कार्यकर्ते व सोबतच प्रकल्पग्रस्त मोठ्या प्रमाणात होते. पोलीसांचा मोठा बंदोबस्त सुध्दा ठेवण्यात आला होता. चर्चा अधिकाऱ्यांसोबत सुरू असतानाच प्रविण काकडे यांनी एका विषयाला धरुन अधिकाऱ्याला शिवीगाळ केली. शिवीगाळ करीत असताना मागे उभा असलेल्या एका कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या चिमुखात भडकावली. यावेळी स्वतःला नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर उपस्थित होत्या. त्यांच्या डोळ्यात देखत हा प्रकार सुरू होता.टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)