.....तर प्रतिभा धानोरकर नाव लावणार नाही #chandrapur #chandrapurloksabha

Bhairav Diwase
0

सहा विधानसभा क्षेत्रात भाजपाचा सुपडा साफ करण्याची घेतली प्रतिज्ञा
चंद्रपूर:- लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 2 लाख 60 हजार मतांनी विजय मिळवला. त्यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव केला.

त्यामुळे चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर यांना मिळवलेला हा विजय धक्कादायक ठरला. त्यानंतर आता प्रतिभा धानोरकर यांनी वरोरा - भद्रावती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान, त्यांनी आभार दौरा काढत विधानसभेत चंद्रपूर जिल्ह्यातून भाजपचा सुपडा साफ करणार असल्याचे म्हंटले.

काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मतदारसंघात आभार दौरा काढला. यावेळी त्या म्हणाल्या की, "येत्या विधानसभेमध्ये जिल्ह्यातील सहा विधानसभेत मीच उमेदवार आहे, असे समजून पक्षाचे काम करणार आहे. यामध्ये सहाही विधानसभेत भाजपचा सुपडा साफ नाही केले, तर प्रतिभा धानोरकर नाव लावणार नाही." असे चॅलेंज त्यांनी दिले आहे. त्या पुढे म्हणाल्या की, "आतापर्यंत काँग्रेसचे मंत्रिपद गडचिरोली जिल्ह्याला मिळत होते. पण यावेळी ते चंद्रपूर जिल्ह्याला कसे मिळेल? यासाठी प्रयत्न करणार आहे."

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)