चंद्रपूर जिल्ह्यात आज मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज chandrapur Rain update

Bhairav Diwase
0
हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

चंद्रपूर:- शहरासह जिल्ह्यात प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर मान्सूनचे (Rain News) आगमन होणार आहे. जिल्ह्यात सोमवार (दि.10) पासून मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. गेल्या 50 वर्षांतील मान्सूनच्या आगमनाची परंपरा आणि हवामान खात्याच्या (Weather News) इशाऱ्यामुळे सोमवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

वादळी वाऱ्यासह वीज पडण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने नागरिकांना मोकळ्या मैदानात, शेतात किंवा झाडाखाली थांबू नये, असा सल्ला दिला आहे. हवामान खात्याने चार दिवसांसाठी 'यलो अलर्ट'ही जाहीर केला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी 40 ते 50 प्रति किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. गेल्या वर्षी झालेल्या पावसाने कोरपना तालुक्यात सर्वाधिक कहर केला होता. झाडे उन्मळून पडण्याच्या आणि घरांवरचे पत्रे उडण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा हवामान विभागाकडून इशारा देण्यात आला आहे.

येत्या काही दिवसांत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोव्यात पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, परभणी, अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, सोलापूर, साताऱ्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई ते अहमदाबादला जोडणाऱ्या महामार्गावरील रस्ता खचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून, त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)