Police Bharti 2024 : आता लाव की मर्दा दम, कोण होणार सिंघम! #Chandrapur #Maharashtrapolice #police

Bhairav Diwase
0
मुंबई:- राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे अडकली होती. 19 जून पासून भरतीचा बिगुल वाजला. राज्यातील विविध जिल्ह्यांत पोलीस भरतीसाठी सकाळपासूनच तरुणाईने गर्दी केली होती.


विविध मैदानांवर तरुणांनी त्यांचा जोश दाखवला. परीक्षार्थी चाचणीसाठी मैदानावर पोहचले आहे. विविध जिल्ह्यांतील एकूण 17 हजार 471 पदांसाठी तरुण-तरुणी दमखम दाखवतील. काही ठिकाणी पावसाने व्यत्यय आणला असला तरी परीक्षार्थींची उमेद आणि उत्साह कायम दिसला. राज्यात रत्नागिरी, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, चंद्रपूरसह इतर ठिकाणी तरुणाई सिलेक्शनसाठी जीवाची बाजी लावत आहे.


भरतीचा वाजला की बिगुल

राज्यात 19 जूनपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरु झाली. एकूण 17 हजार 471 जागांसाठी 17 लाख 76 हजार 256 अर्ज आले आहेत. बँड्समन पदाच्या 41 जागा, तुरुंग विभागात शिपाई पदाची जागा, चालक पदाच्या 1686 जागा, पोलीस शिपाई पदाच्या 9595 जागा तर शीघ्र कृती दलासाठी 4 हजार 349 जागांसाठी राज्यातील परीक्षार्थ्यांनी कंबर कसली आहे.

पोलिस भरतीत इंजिनिअर, डॉक्टरसह MBA, LLB पदवीधर

सध्या सरकारी नोकरी मिळविण्यासाठी उच्चशिक्षित तरुणांनी पण पोलीस भरतीसाठी अर्ज केला आहे. ज्या उमेदवारांनी पोलीस भरतीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यात अभियंता, वकील आणि उच्च शिक्षितांचा पण भरणा अधिक असल्याची माहिती समोर येत आहे.

चंद्रपुरमध्ये तरुणांचा उत्साह

चंद्रपुर पोलीस दलाच्या आस्थापनेवर रिक्त असलेल्या पदांसाठी पोलीस शिपाई भरतीची 19 जूनपासून सुरुवात झाली. भरतीमध्ये एकुण 137 पोलीस शिपाईची आणि 09 बॅण्डस्मनची रिक्त पदे भरण्यात येणार आहे. शिपाई पदासाठी एकूण 22,583 उमेदवारी अर्ज तर बॅंडसमन जागेसाठी 2722 उमेदवारांचे अर्ज आले आहेत. भरती प्रक्रिया पारदर्शकपणे घेण्याकरीता RFID पध्दतीचा वापर करण्यात आलेला आहे. उमेदवारांनी आमिषाला बळी पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. जर पावसामुळे एखादे दिवशी मैदानी चाचणी होऊ शकली नाही तर त्यांना पुढची योग्य तारीख दिली जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)