महिला उमेदवारांसाठी महत्वाची सुचना
1) महिला पोलीस बॅरक, पोलीस फुटबॉल ग्राऊंड तुकूम चंद्रपूर
२) पोलीस मंगल कार्यालय, ताडोबा रोड तुकूम चंद्रपूर
तरी, पोलीस भरती करीता येणाऱ्या महिला उमेदवार यांनी पावसाळ्यात इतरत्र न भटकता वरील नमुद पोलीस दलाकडुन उपलब्ध केलेल्या सोयीच्या ठिकाणी रहावेत. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी केले आहे.
चंद्रपूर जिल्हा पोलीस प्रक्रियेसाठी पोलिस शिपाई पदाकरीता 6 हजार 315 महिला उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहे. तर बॅण्डस्मन पदाकरीता 646 महिला उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहे.