रस्त्याच्या मधोमध पडला भला मोठा खड्डा!

Bhairav Diwase
🟪
राजुरा:- राजुरा तालुका अंतर्गत येणाऱ्या विरूर स्टेशन परिसरातील चिंचोली ते अंतरगाव जवडील रोड वरती भला मोठा खड्डा पडल्याची घटना समोर आली आहे. सदर माहिती नुसार चिंचोली ते अंतरगाव रोडचे काम करून दोन वर्षे पूर्ण होत नाही आणि त्या रोडवरती भला मोठा खड्डा पडल्याने नागरिक अचेंबित आहे की रोडचे काम केले कशाप्रकारे आणि खड्डा पडला कसा रोडवरती मटेरियल निष्कृष्ट दर्जाचे वापरल्याची घटना सामोर येत आहे अशाच प्रकारे ठेकेदार रोडचे काम करतील तर नक्की एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता न करता येत नाही.

🟪
चिंचोली व अंतर गाव चे नागरिक गड्डा पाहून अचंबित झाले आहे. निष्कृत दर्जाचे काम पाहून परिसरातील नागरिक संतापले असून वरिष्ठांना विनंती करत आहे या ठेकेदारावरती कामाची चौकशी करून पुनर्वसन काम करण्यात यावे व निषकृत दर्जाचे मटेरियल वापरले असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी होत आहे.