मुल:- तालुक्यातील भवराळा येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी गावातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व गावातील नागरिकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.
यावेळी मुल शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, उपतालुका प्रमुख, रवींद्र शेरकी, भवराळा ग्रामपंचायतचे उपसरपंच राकेश चौधरी, ग्रां.पं.सदस्य सुरेश नागापुरे, अर्जना दिवाकर मानवगुडे,रवि बारेकर व शाखाप्रमुख सुधीर भंडारे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संदिप भाऊ यांनी आपल्या भाषणातून शिवसेनेचे कार्याची माहिती देत, मुल येथे रोजगार मेळाव्या विषयी माहीती देऊन जास्तीत जास्त संख्येने सुशिक्षित युवकांनी मेळाव्यात येऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून घ्यावी असं आवाहन करण्यात आले. यावेळी भवराळा गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.