जिल्हा कारागृहात खून, कैद्यानेच भोसकले दुसऱ्या कैद्याला #jalgaon #murder

Bhairav Diwase
जळगाव:- भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात यांच्या खून प्रकरणी जळगाव जिल्हा कारागृहात असलेल्या संशयीतामधील अंतर्गत वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी घडली. भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाइंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबूराव खरात (55) यांचा 7 ऑक्टोबर 2019 रोजी भुसावळ येथे खून करण्यात आला होता. या प्रकरणातील संशयित जळगाव कारागृहात आहेत.

यातील एक संशयित मोहसीन असगर खान (34) याचा बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास दुसऱ्या संशयिताने धारदार शास्त्राने वार केले. त्यानंतर मोहसिन यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. घटनास्थळी जिल्हा पेठ पोलिसांनी भेट दिली असून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे.