Murder News: घर मालकाने चाकू भोसकून केला भाडेकरूचा निर्घृण खून #chandrapur #nagpur

Bhairav Diwase
0
नागपूर:- नागपुरात घरमालक आणि त्यांच्या पत्नीच्या वादात पडणे एका व्यक्तीला महागात पडले. घरमालकाने रागाच्या भरात येऊन भाडेकरूचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपी घरमालकाला अटक केली आहे. पंकज सोलंकी असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. हा केम्प्टी परिसरात महेश उके यांच्या घरात भाडे स्वरूपात राहत होता.

सविस्तर वृत्त असे की, नागपूर जिल्ह्यात मयत पंकज शुक्रवारी रात्री ऑफिस मधून आपल्या खोलीत आला तेव्हा त्याने घरमालक आणि त्याच्या पत्नी मध्ये जोरदार वादावादी झाली. पंकज ने मध्यस्थी करून त्यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. या गोष्टीचा घरमालकाला राग आला आणि त्याने रागाच्या भरात येऊन त्याच्या गळ्यावर चाकूने वार केले. त्याला तातडीने जखमी अवस्थेत रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून घरमालकाला अटक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)