चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील झरपट नदीमधून एक कार वाहत गेली असून कारमधील दोघे सुदैवाने बचावले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात संततधार सुरू आहे. मोठे व मध्यम प्रकल्पासह तलाव तुडूंब भरले आहेत. जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. छोट्या मोठ्या नाल्यांना पुरे आला आहे.
चंद्रपूर शहरातील महाकाली कॉलरी मर्गावरील स्मशानभूमीसमोर असलेल्या पुलावरून पाणी वाहत असताना रविवारी दि.28 जुलैला सायंकाळी साडेचारच्या सुमारास दोन युवकांनी पुराच्या पाण्यात कार नेली. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने वाहन पुलावरून नाल्यात वाहून गेले. सुदैवाने दोघेही वाहनातून बाहेर आल्याने जीव वाचला. मात्र कार वाहून गेली. सायंकाळ पर्यंत त्या कारचा शोध लागलेला नव्हता.