चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात हत्येचं सत्र सुरूच असून चंद्रपूर जिल्ह्यात कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला सुऱ्या ने वार करीत तिची हत्या केल्याची घटना बल्लारपूर तालुक्यातील कोठारी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुळेसावली येथे घडली. वंदना धनपाल रामटेके (वय 60) रा. कुडेसावली असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी कोठारी पोलिसांनी आरोपी पती धनपाल माधव रामटेके (वय 67) यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 103 (1) अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
धनपाल व त्याची पत्नी वंदना सोबत वाद व्हायचे. गुरुवारी सकाळच्या वेळी सुद्धा त्या दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान वंदना भांडे घासत असताना धनराज ने धारदार सुऱ्याने वार करीत सुरा तिच्या पाठीत भोसकला. ती मागे वळली असता पुन्हा तो सुरा पोटात भोसकला. त्यानंतर तिने हात समोर केला असता हातावरही वार केला. रक्ताच्या थारोळ्यात वंदना कोसळली.
गावकऱ्यांनी वंदना ला कोठारी येथील रुग्णालयात नेले. मात्र तिची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याने बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच कोठारी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश खरसान घटनास्थळावर दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करून मृतकाचा पती धनपाल रामटेके याला अटक केली. पुढील तपास ठाणेदार योगेश खरसान करत आहेत.