अवैध दारु विक्रीच्या विरोधात महिला आक्रमक
सावली:- सावली तालुयातील गेवरा बुज गावातील अवैध दारु विक्रीविरोधात महिलांनी एल्गार पुकारला असून, यासंदर्भात महिला 22 सप्टेंबर रोजी अवैध दारु विक्री बंद करण्याचा विक्रेत्यांना सूचना देण्यात आल्या होत्या व्यसनमुक्तीच्या विषयावर चर्चा घडवून गावात गत पाच ते सहा वर्षापासून होत असलेली अवैध देशी, विदेशी दारु विक्री बंद करण्यात यावी, ही एकमुखी मागणी महिलांच्या वतीने करण्यात आली
दारुमुळे तरुण पिढी व्यसनाधीत झाली आहे. दारुच्या नशेत गावातील तीन तरुण मृत्यू पावले तर अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे गावातील दारु विक्री तत्काळ बंद करावी, अन्यथा विक्रेत्याच्या विरोधात आंदोलन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. अवैध दारुसंदर्भात यापूर्वी देखील गावातील महिलांनी पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. परंतु त्यावर ठोस कारवाई झाली नाही. या विषयात तत्कालीन महिला मंडळ बचत गट महासंघ उमेद महिलेने पुढाकार घेउन. त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला होता.आणि दारू पकडुन चौकात दारूची होडी करण्यात आली अवैध दारु विक्री बंद करण्यासाठी महिला ग्रामसभेत गावातील सर्वच महिला एकवटल्याचे समोर आले आहे. या संदर्भात प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.