National Service Scheme: सरदार पटेल महाविद्यालयाच्या रासेयो विभागाला गोंडवाना विद्यापीठाचे 3 पुरस्कार जाहीर

Bhairav Diwase


चंद्रपूर:- चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला गोंडवाना विद्यापीठाचा जिल्हास्तरीय उत्कृष्ट एकक सह ३ पुरस्कार मिळाले आहेत. दरम्यान राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड व स्वयंसेवक दर्शन मेश्राम यांचा पुरस्कारात समावेश आहे.


सर्वोदय शिक्षण मंडळाद्वारे संचालित सरदार पटेल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांच्या मार्गदर्शनात विविध महत्वपूर्ण उपक्रम राबविले जातात. यंदाही मोठे उपक्रम राबविले गेलेत. त्याच अंतर्गत २०२३-२४ करीता गोंडवाना विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महाविद्यालयांना पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यात सरदार पटेल महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाला गोंडवाना विद्यापीठ चंद्रपूर जिल्हास्तरीय उत्कृष्ट एकक महाविद्यालय पुरस्कार मिळाला आहे. या योजनेसाठी झटणारे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड यांना चंद्रपूर जिल्हास्तरीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार घोषित करण्यात आला आहे, तर दर्शन मेश्राम ला चंद्रपूर जिल्हास्तरीय उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून गोंडवाना विद्यापीठ द्वारा पुरस्कार जाहीर झाला आहे.


दरम्यान या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणा तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, चंद्रशेखर वाडेगावकर, जीनेश पटेल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.