चंद्रपूर:- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी विजय वडेट्टीवार प्रयत्न करत होते, असा आरोप सातत्याने करण्यात आलाय. शिवाय मला उमेदवारी मिळू नये, यासाठी जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांना आपल्याच पक्षातील लोकांनी सुपारी दिली, पैशाचे आमिष दाखविल्याचा आरोप प्रतिभा धानोरकर यांनी केला होता. लोकसभा निवडणुकीवेळी धानोरकर यांच्याऐवजी वडेट्टीवार त्यांच्या मुलीला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न करत असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. त्यामुळे कुणबी समाजाने वडेट्टीवार यांच्या विरोधात बॅनरबाजी देखील केली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपासून वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यामधील संघर्ष अजूनही संपलेला नाही.
गडचिरोलीत असू देत की ब्रह्मपुरीत अल्पसंख्याक समाजाचे लोक आपले नेतृत्व करीत आहेत. ही परंपरा आपण बदलली पाहिजे. ज्याची जेवढी संख्या त्याची तेवढी हिस्सेदारी या न्यायाने आपण येत्या विधानसभेला कुणबी समाजाच्या उमेदवाराला निवडून द्या, असे सांगत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा पराभव करा, असे अप्रत्यक्ष आवाहन चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. त्यांनी केलेल्या आवाहनामागे वडेट्टीवार यांच्यासोबत असलेल्या संघर्षाची किनार असल्याचे बोलले जाते.
चंद्रपूर लोकसभा तिकीटावरून काँग्रेस पक्षात कमालीचा संघर्ष पाहायला मिळाला होता. राज्याचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार हे आपली कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यासाठी आग्रही होते. तर, पती बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर या जागेवर प्रतिभा धानोरकर यांनी दावा सांगितला होता. दोघांकडूनही आरोप-प्रत्यारोप झाले. त्यात दोघांनीही यासाठी दिल्लीत पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. अनेक दिवस यावर चर्चा झाल्यानंतर प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी जाहीर झाली. परंतु, यानंतरही हे नाराजी नाट्य सुरुच होतं. गडचिरोली येथील महाविकास आघाडीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विजय वडेट्टीवार उपस्थित होते. मात्र, प्रतिभा धानोरकर यांचा उमेदवारी अर्ज भरताना ते आले नाहीत. गडचिरोलीत असू देत की ब्रह्मपुरीत अल्पसंख्याक समाजाचे लोक आपले नेतृत्व करीत आहेत. ही परंपरा आपण बदलली पाहिजे. ज्याची जेवढी संख्या त्याची तेवढी हिस्सेदारी या न्यायाने आपण येत्या विधानसभेला कुणबी समाजाच्या उमेदवाराला निवडून द्या, असे सांगत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा पराभव करा, असे अप्रत्यक्ष आवाहन चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले.