Click Here...👇👇👇

Zp students beating : जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेने केली 17 विद्यार्थ्यांना मारहाण

Bhairav Diwase
सावली:- जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिकेने सातवीच्या वर्गातील 17 विद्यार्थ्यांना बेदम फोडून काढल्याचा प्रकार घडलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत घडलेल्या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शिक्षिकेने मारहाण केल्यानंतर दोन विद्यार्थिनींना अस्वस्थ वाटल्याने सावली ग्रामीण रुग्णालयातही भरती करण्यात आल्याची माहिती आहे.

या शिक्षिकेने सातवीच्या वर्गातील तब्बल 17 विद्यार्थ्यांना मारले असून यातील दोन विद्यार्थिनींवर सावली ग्रामीण रुग्णालयात उपचार देखील सुरू आहेत. चंद्रपुरातील व्याहाड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेतील विषय शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या उज्वला पाटील या शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याने मुलींना त्रास झाला असून दोषी शिक्षिकेवर कारवाई करण्याची पालकांची मागणी आहे. माझ्या पिण्याच्या पाण्यात काहीतरी मिसळवले असा आरोप करत या शिक्षेकेने विद्यार्थ्यांना बेदम मारलं आहे.

आपल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटलीत काहीतरी मिसळल्याचा आरोप करत या शिक्षिकेने ही मारहाण केली असून धनश्री हरिदास दहेलकर आणि लावण्या कुमदेव चौधरी या दोन विद्यार्थिनींना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर सावली ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. या मुलींच्या पालकांची या शिक्षिकेवर कारवाई करण्याची मागणी आहे.