पोंभुर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील राष्ट्रवादी ओबीसी सेलचे (शरद पवार) तालुका अध्यक्ष भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याच्या मथळ्याखाली एका पोर्टल वर बातमी वायरल करण्यात आली. मात्र त्या बातमीचे खंडन स्वतः ओबीसी सेलचे (शरद पवार) पोंभूर्णा तालुकाध्यक्ष राजेंद्र फरकडे यांनी तो मी नव्हेच म्हणत केले आहे. परत त्यांनी म्हटले आहे की, नवेगाव मोरे येथील काही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातील कार्यकर्ते यांनी भाजपात प्रवेश केला असेल मात्र त्यात ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष कोणीही नव्हते ते केवळ कार्यकर्ते होते. त्यामुळे वायरल झालेल्या बातमीशी माझा काहीही संबंध नाही ती बातमीच चुकीची आहे. त्या बातमीत माझे नाव कुठेही नाही. असेही मत ओबीसी सेल (शरद पवार) गटाचे तालुका अध्यक्ष यानी माध्यमाशी बोलतांना व्यक्त केले.
चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे ओबीसी सेलचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष सुधाकर शेषराव काकडे यांनी 23.03.2024 रोजी नियुक्ती पत्र देऊन ओबीसींच्या न्याय हक्कासाठी नियुक्त केले. मी सातत्याने कार्य करीत आहो. त्यामुळे माझा माझ्या पक्षनेतृत्वावर विश्वास असून मी सतत पुढेही कार्य करीत राहीन त्यामुळे ती वायरल झालेली पोर्टल मधील बातमीचा मथळा दुरुस्त करून मला न्याय द्यावा अशी मागणीही केली आहे.