Akrosh morcha : चंद्रपुरात आदिवासीचा आक्रोश मोर्चा

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- धनगर समाजाने आरक्षणासाठी आंदोलन केले. यानंतर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याच्या विचाराधीन सरकार आहे. याला आदिवासी समाजाचा विरोध असून यासाठी आज चंद्रपुरात आदिवासी समाजाच्यावतीने महाआक्रोश मोर्चा काढत अनुसूचित जमातीतून आरक्षण देऊ नये, अशी मागणी केली. यात सर्वपक्षीय आदिवासी कार्यकर्ते सहभागी झाले.

धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात समाविष्ट करू नये; या प्रमुख मागणीसह अन्य १३ मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी १५ सप्टेंबरला धनगर समाजाच्या शिष्टमंडळास धनगर व धनगड या दोन जाती एकच असून त्यांना जात व जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे परिपत्रक लवकरच काढण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. राज्यघटनेत अनुसूचित जमातीच्या सुचीत धनगराचा कुठेही उल्लेख नाही. धनगर समाजाला आधीच एनटी ब मध्ये साडेतीन टक्के आरक्षण आहे.

शिवाय एका याचिकेच्या अनुषंगाने मुंबई उच्च न्यायालयाने १४ फेब्रुवारीला धनगर व धनगड या दोन जाती एक नाहीत, असा निर्णय दिला आहे. पुढे सर्वोच्च न्यायालयानेही उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून अपील फेटाळले. असे असतानाही मुख्यमंत्र्यांनी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देणे चुकीचे असल्याचे आदिवासी नेते- कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)