चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नम्रता ठेमस्कर यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
विधानसभेचे निवडणुकीचे वारे सुरू आहे. अनेकांची काँग्रेसमध्ये इन्कमिंग असताना श्रीमती ठेमस्कर यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
काय म्हणाले राजीनाम्यात...
मी आज चंद्रपूर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीचा राजीनामा देत आहे. मला आजपर्यंत महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसकडून ज्या ज्या सूचना, उपक्रम, आंदोलन मिळाले ते मी प्रामाणिकपणे राबवले. परंतु जिल्ह्यातील पक्षाच्या काही नेत्यांनी जिल्ह्यात काँग्रेस पक्षा
*मध्ये प्रचंड जातीयवाद निर्माण केला आहे. त्याच सोबत जेव्हापासून मी वरोरा विधानसभेचा इच्छुक उमेदवार म्हणून अर्ज भरला तेव्हापासून मला नेत्यांनी अपमानास्पद वागणूक दिली. या बाबत मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी श्री. रमेश चॅनिथला सर यांना सुद्धा या बाबत लेखी तक्रार दिली आहे. पण मी पदावर राहू नये म्हणून माझ्यावर दबाव निर्माण करण्यात आला. सोबतच मी विधान सभेचा इच्छुक म्हणून फॉर्म भरल्यानंतर मला पदावरून काढून टाकू म्हणून सतत अप्रत्यक्षपणे धमक्या देण्यात आल्या. या सर्व प्रकाराला कंटाळून मला वाटत नाही की मी या पदावर राहावे. म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे.