Chandrapur News: कॉंग्रेस शहराध्यक्षचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अकोल्यातून अटक, काँग्रेसमधून हकालपट्टी

Bhairav Diwase
चंद्रपूर:-  चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात आरोपी अमोल लोडे याला अकोल्यातुन अटक करण्यात आली आहे. आरोपी अमोल लोडे युवक काँग्रेसचा कोरपना शहर अध्यक्ष आहे. शाळेत शिक्षक असलेल्या लोडे याने 12 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तर, या घटनेचे राजकीय पडसादही उमटताना दिसून येत आहेत.


उन्हाळ्यात शिकवणी वर्ग घेण्याचे बहाण्याने आरोपी शिक्षकाने पीडित मुलीला शाळेत बोलावून अत्याचार केला. सोबतच तुझ्या आई-वडिलांना जीवानिशी मारून टाकेन धमकी आरोपीने पीडित मुलीला दिली होती. मात्र, पीडित मुलीने घरच्याकडे या घृणीत प्रकरणाची वाच्यता केल्याने हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी, पोलिसांनी पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.