Sudhir mungantiwar: मंत्री सुधीर मुनगंटीवार तातडीने दिल्लीला रवाना

Bhairav Diwase
0
चंद्रपुरात आयात उमेदवारांना प्राधान्य दिल्याने मुनगंटीवार नाराज?
चंद्रपूर:- चंद्रपूर मध्ये आयात उमेदवारांना प्राधान्य दिल्याने सुधीर मुनगंटीवार नाराज असल्यास कळतयं.... मंत्री सुधीर मुनगंटीवार दिल्ली दरबारी आपली नाराजी मांडतील अशी ही माहिती मिळते. कार्यकर्त्यांच्या भावना पक्ष श्रेष्ठीपर्यंत पोहोचवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. सुधीर मुनगंटीवार त्यासाठी तातडीने दिल्ली रवाना झाले आहे. भारतीय जनता पक्ष आमदार किशोर जोरगेवार यांना मैदानात उतरवू शकतो अशी चर्चा त्यामुळे चंद्रपूर विधानसभेवरून भाजपामध्ये घमासान सुरू आहे. 

काय म्हणाले मुनगंटीवार? 

दिल्लीला काही कामासाठी चालो आहे. राजकीय कामासाठी चाललो आहे. आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांची भूमिका, त्यांचं मत, हे आपल्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचावं, यासाठी मी दिल्लीला चालो आहे. त्यांची बाजू मांडण्यापेक्षाही चंद्रपूर विधानसभेच्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांची इच्छा आहे की, ज्यांनी पाच वर्ष काम केलं त्याला तिकीट दिली पाहिजे अन्यथा भविष्यामध्ये कोणीही कार्यकर्ता संघटन चालवण्यासाठी काम करणार नाही. निष्ठावान ज्यांनी पाच वर्ष नव्हे 25-25 वर्ष पक्षाचा काम केलं, पक्ष संघटना वाढवली. त्यांना तिकीट देण्याच्या ऐवजी आयात करून तिकीट दिली तर संघटन जे आहे ते विस्कळीत व्हायची शक्यता आहे. ज्या उमेदवारांनी पाच वर्षांमध्ये अनेक पक्ष बदलवले. त्यांना तिकीट देण्याचा विचार जर पक्ष करत असेल तर यातून कार्यकर्त्यांच्या मनामध्ये नाराजी निर्माण होते आणि पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून हि नाराजी अवगत केली पाहिजे, शेवटी पक्षाने काय निर्णय करायचा नेतृत्व आणि हा त्यांचा अधिकार आहे. पण पक्षाच्या नेत्यांपर्यंत कार्यकर्त्यांची जर नाराजी पोहोचवली नाही, संघटनेच्या संदर्भातला भावाने आशय पोहोचवलं नाही, तर फक्त निवडणूक लक्षात घेऊन निवडणुकीतले निर्णय केले. तर मग नंतर मात्र संघटन हे पूर्णपणे सेवाभावी संघटनेच्या ऐवजी ते व्यावसायिक संघटन होईल आणि म्हणून कार्यकर्त्यांनी आग्रह केला. काल साधारणता 500-700 कार्यकर्ते आले आणि त्यांनी आग्रह केला की आमची भावना आम्ही 700 लोक जाऊ शकत नाही पण आमची भावना तुम्ही तरी पोहोचवा, कारण आम्ही तुमच्यासोबत काम करतो आणि तुम्ही जर ही भावना पोहोचवली नाही तर कदाचित नेत्यांचे लक्षात येणार नाही की तीव्रता काय आहे असंतोष काय आहे मनाची भावना काय आहे. वारंवार फक्त निष्ठा बदलणाऱ्या, पक्ष बदलणाऱ्यांना जर आपण तिकीट दिली तर उद्या पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता महानगरपालिका असेल किंवा कोणतीही निवडणूक असेल अशाच पद्धतीने निष्ठा बद्दल एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करणार नाही.

ब्रिजभूषण पाझारे बद्दल काय म्हणाले मुनगंटीवार? 

आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यापैकी दिली पाहिजे प्रामुख्याने त्यांनी ब्रिजभूषण पाझारे जो अनुसूचित जातीचा आहेच. पण साधारणता 1990 पासून तो काम करतो. जिल्हा परिषद मध्ये सभापती होता, जिल्हा परिषद मध्ये सदस्य राहिला, पंचायत समितीचा सदस्य राहिला आणि जी-जी निवडणूक लढवली ती -ती त्यांनी जिंकली आहे. कार्यकर्त्यांसोबत चांगली वर्तवणूक ठेवली आहे. आता निष्ठेनी राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठिशी जर उद्या पक्ष राहिला नाही. मी समजू शकतो की एखाद्याला पक्षात घेऊन तिकीट दिली तर ती त्यावेळीची गरज असते. पण पाच वर्षांमध्ये अनेकदा पक्ष बदलवणाऱ्यांना जर टिकीट देण्याची पद्धत सुरू केली एकदा, दोनदा नवे तर अनेकदा... तर मग त्यातून मात्र वाईट परिणाम कार्यकर्त्यांच्या मनावर होईल आणि पुढे मग त्या पक्षाला संघटित ठेवणं. कार्यकर्त्यांना संघटित ठेवणं कार्यकर्त्यांच्या समोर भूमिका मांडणे अवघड होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)