चंद्रपूर:- महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पुर्व परिक्षा-2024 जिल्ह्यातील विविध केंद्रावर 1 डिसेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात सकाळी 8 ते सायं 6 वाजेपर्यंत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निर्बंध लागू करण्यात येत आहे. सदर आदेश जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या सही व शिक्क्यानिशी निर्गमीत करण्यात आले.
1 डिसेंबर 2024 रोजी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी 100 मीटर परिसरांतर्गत सकाळी 8 ते सायं 6 वाजेपर्यंत परीक्षार्थी व्यतिरीक्त 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्रित जमा होणार नाहीत. तसेच सदर वेळेत व परिसरात नियमित व रोजचे वाहतुकीव्यतिरिक्त इतर कोणत्याही हालचालींना प्रतिबंध राहील. परीक्षा केंद्राच्या 100 मीटर क्षेत्रांतर्गत परीक्षेदरम्यान झेरॉक्स, फॅक्स, एस.टी.डी.बुथ, पेजर, मोबाईल फोन, ईमेल, इंटरनेट सवलती किंवा इतर कोणत्याही कॉम्युनिकेशन सवलतींना प्रतिबंध राहील.
या परिक्षा केंद्राना लागू राहतील आदेश :
1) विद्याविहार हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, तुकूम, चंद्रपूर
2) सरदार पटेल महाविद्यालय, गंजवॉर्ड,चंद्रपूर,
3) बी.जे.एम. कार्मेल अकादमी, तुकूम चंद्रपूर,
4) रफी अहमद किदवाई मेमो हायस्कूल, घुटकाळा वॉर्ड, चंद्रपूर,
5) सेंट मायकल इंग्लिश स्कूल, नगीनाबाग, चंद्रपूर,
6) बजाज पॉलिटेक्निक, बालाजी वॉर्ड, चंद्रपूर,
7) माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूल, चंद्रपूर,
8) मातोश्री विद्यालय, ताडोबा रोड, चंद्रपूर,
9) चांदा पब्लिक स्कूल, रामनगर चंद्रपूर
10) भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, मुल रोड, चंद्रपूर.
सदर आदेश परीक्षा दिनी अंमलात राहतील. आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तिविरुध्द प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हादंडाधिका-यांच्या आदेशात नमूद आहे.