आदिवासी बांधव अतिशय प्रामाणिक, कष्टाळू आहेत. आजही आपण पाहतो की स्वातंत्र्यानंतरही आदिवासी विकासापासून वंचित आहेत. त्यांचा संघर्ष मोठा आहे. त्यांच्यासाठी असलेल्या अनेक शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याने त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
1995 पासून सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेचा आमदार असतांना पासून आतापर्यंत विधानसभेत विविध संसदीय आयुधांचा वापर करून सरकारला आदिवासी बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यास भाग पाडले. आदिवासी बांधवांच्या हितासाठी 200 कोटी रुपयांची खावटी कर्जमाफीचा निर्णय असो की रिक्त पदे भरण्याचा प्रश्न असो, संसदीय संघर्षातून त्यांनी मोठी मालिका निर्माण केली, अनुसूचित जमाती. १८५८ च्या स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांशी लढताना शहीद झालेले क्रांतिकारक बाबुराव पुलेश्वर शेडमाके हे आदिवासी समाज बांधवांसाठी प्रेरणास्थान आहेत. शहीद क्रांतिकारक बाबुराव शेडमाके यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टपाल तिकिटांचे जतन व्हावे, अशी आदिवासी समाज बांधवांची मागणी होती. केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून ही मागणी त्यांनी पूर्ण केली.
पोंभुर्णा येथे हुतात्मा क्रांतिकारक बाबुराव शेडमाके यांच्या स्मरणार्थ सभागृहाचे बांधकाम, चंद्रपूरमध्ये त्यांच्या नावाचे इनडोअर स्टेडियम, आदिवासी विद्यार्थी व महिला विद्यार्थिनींसाठी वसतिगृहे बांधण्यास मंजुरी आदींसोबत चंद्रपुरातील वीर बिरसा मुंडा स्मृती चौकाचे बांधकाम असो, सुशोभीकरण असो, आदिवासी बांधवांच्या हिताचे अनेक निर्णय त्यांनी घेतले. नेहमी त्यांच्या हिताचा आणि कल्याणाचा विचार केला. या संदर्भातील माहितीची शृंखला वृत्ताच्या माध्यमातून प्रकाशित करीत आहोत.