IND vs ENG 1st ODI: अक्षर- अय्यर चमकले! गिलने जिंकलं 'दिल'; भारताची इंग्लंडवर विजयी सलामी

Bhairav Diwase

नागपूर:- टि- २० मालिकेत ४-१ ने धूळ चारल्यानंतर वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारताने इंग्लंडचा चांगलाच पाहूणचार केलाय. श्रीलंकेकडून २-० ने पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता.

गिल- अक्षरची शतकी भागीदारी

श्रेयस अय्यरने पाया रचल्यानंतर, शुभमन गिल आणि अक्षर पटेल यांनी शतकी भागीदारी करत भारताच्या विजयाचा कळस चढवला. या डावात दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समचार घेतला. दोघांनी शानदार शतकी भागीदारी करत भारताला ४ गडी राखून विजय मिळवून दिला. यादरम्यान गिलने ८७ धावांची खेळी केली. तर अक्षरने ५२ धावांची खेळी केली.


इंग्लंडने केल्या २४८ धावा

या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडकडून जोस बटलरने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. तर जेकब बेथलने ५१ धावा केल्या आणि फिल सॉल्टने ४३ धावा केल्या. इंग्लंडचा डाव ४७.४ षटकात २४८ धावांवर आटोपला.