दगडफेक अन् जाळपोळ, नागपुरात दोन गटांत तुफान राडा
नागपूर:- नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कबरीच्या वादावरून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. महाल परिसरामध्ये दोन गट आमने सामने आले आहेत. सकाळी औरंगजेबाच्या कबरीविरोधात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आलं होतं, यानंतर संध्याकाळी दोन गट आमने-सामने आले आहेत.
संतप्त जमावाने दगडफेक करत काही वाहनांची तोडफोडही केली आहे. महाल परिसरामध्ये तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत.