मुंबई:- अर्थसंकल्पात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली नसल्याने विरोधकांनी सरकारला घेरले आहे. यातच भाजपा ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी 'कर्जमाफीसाठी घाबरता का, करा ना धाडस,' असे सरकारला सल्ला दिला आहे.
मुनगंटीवार यांच्याकडून सतत सरकारला धारेवर धरले जात असल्याने सत्ताधाऱ्यांची चांगलीच पंचाईत झाल्याचे पाहायला मिळत आहे. विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे.
मंगळवारी विरोधी पक्षातील भास्कर जाधव, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, सुनील प्रभू, रोहित पवार यांनी सरकारला लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफी, शक्तिपीठ महामार्ग यावरून सरकारला चांगलेच घेरले. सत्ताधारी पक्षाचे नेते मुनगंटीवार यांनीच सरकारला शेतकरी कर्जमाफीवरून फटकारल्याचे पाहायला मिळाले.
तुझसे नाराज नहीं...
मुनगंटीवार म्हणाले, की मी काही बोललो की मग ते म्हणतात की मंत्री केले नाही म्हणून नाराज आहे. मात्र यात काही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले. आमचे नेते नितीन गडकरी नेहमी एक गाणं गुणगुणतात. माझे'तुझसे नाराज नहीं जिंदगी हैरान हूँ मैं,' या गाण्याच्या ओळी म्हणत त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या.