Dr. Ashok Uike: पालकमंत्री डॉ. अशोक उईके 2 जून रोजी चंद्रपुरात

Bhairav Diwase

चंद्रपूर:- राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे 2 जून 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

सोमवार दि. 2 जून रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीस उपस्थिती, दुपारी 1 ते 2 या वेळेत नियोजन भवन चंद्रपूर येथे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याकरीता राखीव, दुपारी 2 वाजता नागपूरकडे प्रयाण.