Chandrapur Lightning News : देवदर्शनासठी गेलेल्या तरुणावर वीज पडून मृत्यू

Bhairav Diwase

चिमूर:- चिमूर शहरातील एका तरुणावर वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सोमवार (9 जून) रोजी सायंकाळी ४ ते ५ दरम्यान घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. प्रथमेश अतुल वानखेडे (वय २०) रा. चिमूर असे मृतकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रथमेश आपल्या काही मित्रांसोबत चिमूरपासून काही अंतरावर असलेल्या बोरगाव येथील हनुमान मंदिरात देवदर्शनासाठी गेला होता. यावेळी वातावरण अचानक ढगाळ झाले आणि जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही क्षणातच आकाशात कडकडाटासह विजा चमकू लागल्या. याचवेळी वीज पडून प्रथमेशचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे प्रथमेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तो आपल्या कुटुंबातील एकमेव कमावता असल्याची माहितीही मिळाली आहे. त्याच्या अकस्मात जाण्यामुळे चिमूर परिसरात शोककळा पसरली आहे.