नागपूर:- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष संजय डोंगरे तथा चिमूर काँग्रेस समितीचे अध्यक्ष प्रशांत पिसे यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात हा प्रवेश झाला.
डोंगरे आणि पिसे यांचा भाजप प्रवेश हा काँग्रेस नेते वडेट्टीवार यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.संजय डोंगरे यांच्या भाजप प्रवेशात चिमूरचे आमदार बंटी भांगडीया यांची महत्वाची भूमिका आहे.
तसेच चिमूर तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष प्रशांत पिसे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला. या सर्वांचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांनी स्वागत केले व पुढील पक्ष कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी विधान परिषद सदस्य मितेश भांगडिया, राजू देवतळे, राजू पाटील झाडे, मनीष तुंपलीवार, डॉ. शाम हटवादे, कमलाकर लोनकर, ओम पाटील गणोरकर, पार्थ भांगडिया व इतर उपस्थित होते.