Chandrapur News: चंद्रपुरात 'मुल पळवणारी टोळी' सक्रिय असल्याच्या अफवांना पूर्णविराम!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात लहान मुलांना पळवून नेणाऱ्या महिलांची टोळी फिरत असल्याच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले व्हिडिओ पूर्णपणे अफवा असल्याचे समोर आले आहे. चंद्रपूर पोलिसांनी या अफवांना स्पष्टपणे फेटाळून लावले आहे.

शहरात अशी कोणतीही टोळी सक्रिय नसून, ज्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, ती एक मनोरुग्ण महिला आहे. तिचे उपचार सुरू असून, ती घरातून निघून गेल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. शुक्रवार, २१ जून रोजी चंद्रपूर शहर पोलिसांनी या महिलेला तिच्या पती आणि सासूच्या ताब्यात दिले आहे. त्यामुळे, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ आणि त्यासोबतच्या 'मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय आहे' या सर्व बातम्या चुकीच्या आणि अफवा आहेत.

नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका आणि समाजात भीतीचे वातावरण निर्माण करू नका. कोणत्याही माहितीची सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय ती पुढे पाठवू नका.