मुंबई:- मराठी शाळेसोबतचं आता सर्व माध्यमांच्या शाळेसाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या शाळांत आता राष्ट्रगीतानंतर राज्यगीतगाणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत आता सर्वच शाळांमध्ये गाणे बंधनकारक असेल.
जी शाळा या नियमाची अंमलबजावणी करणार नाही त्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा राज्याचे शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिला आहे. मराठी शाळेत राष्ट्रगीत आणि राज्यगीत मानवंदनेने गायलं गेलं पाहिजे. मराठी शाळेसोबतचं आता सर्व माध्यमाच्या शाळेतही राष्ट्रगीतानंतर "गर्जा महाराष्ट्र माझा" हे राज्यगीत गाणं बंधनकारक आहे असा आदेश देण्यात आला आहे.
0 टिप्पण्या