चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याचा ऐतिहासिक वारसा दर्शवणारे "MH-34, हमारा चांदा" हे खास चित्र प्रदर्शन १५ ते १७ ऑगस्ट दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहातील भारतरत्न लता मंगेशकर कला दालनात हे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. माजी अर्थ व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.
गेल्या नऊ वर्षांपासून हे प्रदर्शन आयोजित केले जात आहे. जिल्ह्याच्या समृद्ध ऐतिहासिक वारसाबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने युवा चित्रकार प्रवीण कावेरी यांनी 'पॉप आर्ट' या शैलीत ही चित्रे साकारली आहेत. दरवर्षी प्रदर्शनामध्ये जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळांची चित्रे सादर केली जातात.
या महत्त्वपूर्ण चित्र प्रदर्शनाला जिल्ह्यातील सर्व कलाप्रेमी, युवा वर्ग आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या आवाहनात चित्रकार प्रवीण कावेरी यांच्यासह इंटॅकचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक सिंह ठाकूर, धिरज कावेरी, अनिल दहागावकर, डॉ. दिपक भट्टाचार्य, प्रवीण निखारे, नंदू सोनारकर, किशोर महेश्वर, हेमंत तोमर आणि जितेंद्र इटनकर यांचा समावेश आहे.