चंद्रपूर:- भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वादाचा धुराने कार्यकर्त्यात मोठी दुरी निर्माण केली. राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांचे कट्टर समर्थक असलेल्या राजेंद्र अडपेवार यांनी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला होता. त्यांनी हा निर्णय का घेतला याचे चिंतन-मनन सुरु असतानाच आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक असलेले माजी नगरसेवक राजीव गोलीवार यांनी देखील महानगर भाजपाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.यामुळे भाजपाचा गोटयात एकच खळबळ उडाली आहे.
आम्ही पक्ष्याचे कार्यकर्ते मजूर नाही?
भाजपाचा निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्याची चर्चा सुरू असतानाच त्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिल्या जात नसल्याचे बोलले जात आहे. हे सारं भाजपात नव्याने प्रवेश केलेल्या नेत्याकडून सुरु आहे. त्याला काही जेष्ठ नेत्यांचे बळ मिळत असल्याची चर्चा राजकारणात आहे.एका नेत्याचा वाढदिवसाला गोलीवार गेले नाहीत.यामुळे त्यांना थेट पक्षाने नोटीस पाठविली.गोलीवार म्हणाले की, "आम्ही गेली ३५ वर्षे पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहोत, पण जर एखाद्याच्या वाढदिवसाला गेलो नाही, तर पक्षाचे महानगराध्यक्ष नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागतात. आम्ही पक्षाचे सन्मानित कार्यकर्ते आहोत, मजूर नाही." ही बाब त्यांनी आपल्या राजीनामा पत्रात नमूद केली आहे.त्यांनी आपला राजीनामा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शहर जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोट्टवार यांच्याकडे पाठविला आहे.
निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या अपमान...
राजीनाम्यामध्ये पक्षात जुन्या कार्यकर्त्यांचा अपमान केला जात असल्याचे तसेच इतर पक्षांतून आलेल्या सदस्यांना मोठी पदे देण्यात येत असल्याने पक्षातील जुने निष्ठावान कार्यकर्ते दुखावले गेले आहेत, याकडे गोलीवार यांनी लक्ष वेधले. पक्षातील शिस्तीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या राजीनाम्यामुळे पक्षात अजून घमासान वाढण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीप्रमाणे, पक्षातील आणखी काहीजण राजीनाम्याची तयारी करत आहेत.
असं राजकारण यापूर्वी भाजपात झालं नाही...
भाजपाचा ज्येष्ठ नेत्या सोबत यांनी म्हटलं, भाजपचं काँग्रेस होऊ देऊ नका. मात्र बघता बघता पक्षात धुसपुस वाढली. माजी मंत्री हंसराज अहिर, आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यातील अंतर्गत नाराजी अधूनमधून चर्चेचा विषय ठरली होती. चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या पक्ष प्रवेशाला मुनगंटीवार यांनी विरोध केला होता. आता मुनगंटीवार-जोरगेवार यांच्यातील नाराजीची चर्चा सुरु आहे. याचा प्रभाव पक्षावर झाला आहे. आज घडीला चंद्रपूर भाजपात जे काही घडत आहे, याआधी असं कधीच घडलं नसल्याचे बोलले जात आहे.