sp college Chandrapur : सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर येथे गणित विभागाद्वारे "फायनान्शियल मॅथेमॅटिक्स" या विषयावर कार्यशाळेचे उद्घाटन

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात गणित विभागाकडून *पीएम उषा अंतर्गत जीएमसी रुसाद्वारे तज्ञांचे विचार ज्ञान आणि माहिती विद्यार्थ्यांना मिळावी याकरिता *"फायनान्शिअल मॅथेमॅटिक्स* "या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला.

सरदार पटेल महाविद्यालयाच्या अब्दुल शफी सभागृहात हा कार्यक्रमा पार पडला. ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर हे होते तर अभ्यासक व जाणकार डॉ. वेदानंद अलमस्त , को ऑर्डिनेटर SNDT University मुंबई बल्लारपूर कॅम्पस चंद्रपूर, डॉ वी. कुमार asst. Proff. And HOD Mathematics चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, पोंभुर्णा हे होते. या सोबतच महाविद्यालयाचे गणित विभाग प्रमुख डॉ. आर. बी. सिसोदिया Asst. Prof. and HOD Mathematics व गणित विभागातील इतर सहकारी प्राध्यापक प्रामुख्याने उपस्थित होते. 

Financial Mathematics बाबत कार्यशाळेचे मार्गदर्शन करीत असताना डॉ. वेदानंद अलमस्त सरांनी आजच्या युगात Financial Mathematics किती महत्वपूर्ण आहे व त्याचा उपयोग शिक्षणात आणि दैनंदिन व्यवहारात केल्यास किती वेळेची बचत होते हे समजावून सांगितले. त्यानंतर त्यांनी पावर पॉइंट च्या माध्यमातून ह्या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यानंतर डॉक्टर व्ही कुमार सर व डॉ. वेदानंद अलमस्त सर यांनी देखील फायनान्शियल मॅथेमॅटिक्स विषयाचे महत्त्व विद्यार्थ्यांना उदाहरणाद्वारे समजावून सांगितले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणित विभाग प्रमुख डॉ. आर. बी सिसोदिया सर यांनी केले त्यांनी आजच्या युगात मॅथेमॅटिक्स चे महत्व काय आहे हे विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक वैष्णवी कामडे यांनी केले. आभार प्रदर्शन प्राध्यापक साक्षी साखरकर यांनी केले या कार्यशाळेचे गणित विभागातील प्रा. सुविधा चिंतावार, प्रा. काजल फुलझले तसेच गणित विभागातील व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपरोक्त उपक्रमाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्यकारी अध्यक्ष किशोर भाऊ जोरगेवार, उपाध्यक्ष श्री सुदर्शन निमकर, सचिव श्री प्रशांत पोटदुखे, सहसचिव तथा माजी कुलगुरू गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली माननीय डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष श्री संदीप वामनराव गड्डमवार व सन्माननीय सदस्य श्री राकेश पटेल, श्री एन. रमजान श्रीमती सगुनाताई तलांडी व कार्यकारणी सदस्य श्री सुरेश पोटदुखे सर्वसाधारण सदस्य चंद्रशेखर वाडेगावकर श्री जिग्नेश सुधीर पटेल तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.एम. काटकर, उपप्राचार्य डॉक्टर एस. व्ही. माधमशेट्टीवार, गणित विभाग प्रमुख डॉक्टर आर. बी. सिसोदिया, प्रा. सुविधा चिंतावार व विभागातील इतर प्राध्यापक वृंद यांनी देखील यशाबद्दल अभिनंदन केले.