चंद्रपूर:- चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरीता 15 जानेवारी रोजी मतदान तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. शहरातील इंडस्ट्रिअल ईस्टेट वार्ड, एम.आय.डी.सी, बंगाली कॅम्प चौक येथे स्ट्रॉंग रूम तयार करण्यात आली असून झोनच्या मागील बाजूने निवडणुकीच्या वाहनांकरीता 14 ते 16 जानेवारी या कालावधीत बसेस करीता पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने 1) शिवशक्ती सिमेंट प्रोडक्शन ते हिरामोती फर्निचर दुकान पर्यंत 2) हिरामोती फर्निचर दुकान ते आर्यन के स्टोर्ट शॉप पर्यंत 3) मराठा फेब्रीकेशन दुकान ते एम.एस.सी.बी कार्यालय आतील परीसरकडे जाणारा रोड पर्यंतचा रस्ता, सर्व प्रकारच्या वाहनांना बंद ठेवण्यात येत आहे. नागरिकानी या मार्गावर शक्यतो वाहने पार्किंग करू नये.
सदर अधिसूचना 14 जानेवारीच्या सकाळी 8 वाजतापासून 16 जानेवारीच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत अंमलात राहील. तसेच सदर अधिसुचनेच्या अमंलबजावणीमध्ये आवश्यक्तेनुसार बदल करण्यात येईल. सदर परिसरात राहणाऱ्या नागरिकांव्यतिरिक्त इतर नागरिकांना नमुद रस्ता पुर्णपणे बंद करण्यात येत आहे.
तरी नागरिकांनी वरील अधिसुचनेचे पालन करून शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरीता पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी केले आहे.

