चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदी माझी झालेली निवड ही माझ्यासाठी अभिमानाची आणि जबाबदारीची बाब आहे. या यशामागे लोकनेते, विकासपुरुष आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे मार्गदर्शन, विश्वास आणि भक्कम पाठबळ आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि कार्यपद्धतीमुळेच मला ही संधी मिळाली असून, त्यांनी दाखवलेल्या विकासाच्या वाटेवर चालत चंद्रपूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्धतेने काम करण्याचा माझा संकल्प आहे, असे प्रतिपादन नवनिर्वाचित महापौर सौ. संगीता खांडेकर यांनी केले.
पुढे त्या म्हणाल्या, चंद्रपूरच्या विकासासाठी अखंड झटणारे, शहराला नवी दिशा देणारे आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे असे सुधीरभाऊ आमच्यासाठी खरे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि कार्यपद्धतीमुळेच मला ही संधी मिळाली असून, त्यांच्या नेतृत्वामुळेच चंद्रपूरमध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.सौ. खांडेकर यांनी मनःपूर्वक सुधीरभाऊंचे आभार मानत, त्यांनी दाखवलेल्या विकासाच्या वाटेवर चालत चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
शहरातील प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, स्वच्छ, सुंदर आणि विकसित चंद्रपूर घडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेवटी त्यांनी चंद्रपूरकरांचे आशीर्वाद आणि सहकार्य असेच मिळत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करत सर्व चंद्रपूरकरांचे आणि नगरसेवकांचे आभार मानले.

