Chandrapur News: तीन दिवसांत खुलासा करा, अन्यथा...; प्रदेश काँग्रेसकडून गटनेते अडुर यांना अल्टीमेटम.

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस अंतर्गत असलेला वाद आता थेट नोटीसबाजीवर येऊन पोहोचला आहे. काँग्रेसचे गटनेते राजेश अडुर यांना पक्षाने 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे.

महानगरपालिकेत काँग्रेसची सत्ता असतानाही अंतर्गत गटबाजी थांबण्याचे नाव घेत नाहीये. स्थायी समितीमध्ये सदस्यांची नावे देताना गटनेते राजेश अडुर यांनी मनमानी केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

 विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याशी चर्चा न करताच नावे निश्चित केली. खासदारांनी सुचवलेल्या नावांचा विचार न करता स्वतःच्या मर्जीने नावे दिली. या कृतीला पक्षशिस्तीचा गंभीर भंग मानले गेले आहे.

या प्रकरणी वरिष्ठ उपाध्यक्ष ड. गणेश पाटील यांनी ही नोटीस बजावली असून, राजेश अडुर यांना पुढील तीन दिवसांत आपला लेखी खुलासा प्रदेशाध्यक्षांकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जर हा खुलासा समाधानकारक नसेल, तर अडुर यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेतही पक्षाने दिले आहेत.