गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्रातील माओवाद आता जवळजवळ संपुष्टात आला असून, कधीकाळी गडचिरोली जिल्ह्रातील 10 उपविभागात सक्रिय असणारी माओवाद चळवळ आता फक्त भामरागड उपविभागाच्या सिमावर्ती भागातच कैद झालेली आहे. यासोबतच शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमूळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ माओवाद्यांसह अनेक जहाल माओवाद्यांनी आजपर्यंत पोलीसांसमोर आत्मसमर्पण केलेले आहे. त्याचबरोबर आत्मसमर्पित माओवाद्यांचे पोलीस दलाने पुनर्वसन घडवून आणल्यामुळे आजपर्यंत एकुण 805 माओवाद्यांनी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे.
आज दिनांक 31/03/2026 रोजी नऊ माओवादी सदस्य नामे
1) दसरी ऊर्फ पिडे सन्नु वेको (एसीएम – नॅशनल पार्क डॉक्टर टीम), वय 35 वर्षे, रा. आदवारा, ता. भैरमगड, जि. बिजापूर (छ.ग.),
2) रामजी अडमा पोटाम (एसीएम – सँड्रा दलम नॅशनल पार्क (कृषी विभाग)), वय 40 वर्षे, रा. मोठा पुसनार, ता. व जि. बिजापूर (छ.ग.)
3) शांती वंजा वड्डे (एसीएम – इंद्रावती दलम), वय 35 वर्षे, रा. कवंडे, जि. बिजापूर (छ.ग.)
4) मनकु मासो पोडाम (सदस्य - सँड्रा दलम) वय 35 वर्षे, रा. डोक्के, ता. भैरमगड, जि. बिजापूर (छ.ग.)
5) सरिता रामा वेलकम (सदस्य – नॅशनल पार्क मोपोस), वय 25 वर्षे, रा. गंगनपल्ली, ता. आवापल्ली, जि. बिजापूर (छ.ग.)
6) लखमी आयतु कुंजाम (सदस्य – मोपोस नॅशनल पार्क), वय 26 वर्षे, रा. गमपूर ता. व जि. बिजापूर (छ.ग.),
7) नंदे जोगा मडे (सदस्य – मोपोस, माड एरीया), वय 22 वर्षे रा. रामगुंडम, ता. कोंटा, जि. सुकमा (छ.ग.),
8) राकेश कोरके मज्जी (सदस्य – सँड्रा दलम नॅशनल पार्क), वय 30 वर्षे, रा. तुमरगुंडा, ता. भैरमगड, जि. बिजापूर (छ.ग.),
9) सुक्की बामी कुंजाम (सदस्य – पामेड एरीया दलम), वय 22 वर्षे, रा. बुसाम, तह. उसुर, जि. बीजापूर (छ.ग.), यांनी गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले आहे.
यापैकी शांती वंजा वड्डे हिने आपल्या एके 47 रायफल व 30 नग जिवंत काडतुसांसह तसेच सुक्की बामी कुंजाम हिने आपल्या कारबाईन रायफलसह आज रोजी आत्मसमर्पण केले आहे. तसेच त्यांनी पोस्टे कवंडे पासून 15 किलोमिटर अंतरावर असलेल्या महाराष्ट्र - छत्तीसगड सिमेवरील मौजा कुमनार जंगल परिसरात पुरुन ठेवलेल्या (डंप) माओवादी साहित्याची माहिती दिली होती. यावरुन मौजा कुमनार जंगल परिसरातून 01 – एके 47 रायफल, 03 - मॅगझीन, 57 जिवंत काडतूस, 03 - वॉकीटॉकी, 04- वॉकीटॉकी बॅटरी, 20 - पेनड्राईव्ह यासह मोठ¬ा प्रमाणावर शस्त्रास्त्रे व दारुगोळा हस्तगत करण्यात आला आहे. यासोबतच उर्वरित सात माओवादी हे मागील पाच दिवसांपुर्वीच आत्मसमर्पण करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलासमक्ष हजर होऊन यादरम्यान या त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी नॅशनल पार्क एरीयातील गंुडापुरी जंगल परिसरात हत्यारे, दारुगोळा व इतर साहित्य जमिनीमध्ये पुरुन ठेवले (डंप) असल्याचे सांगितले होते. यावरुन गडचिरोली पोलीस दल व छत्तीसगड पोलीसांमध्ये समन्वय साधण्यात येऊन संबंधित ठिकाणावरुन 7.62 एसएलआर – 02 नग, सिंगल शॉट – 01 नग, डेटोनेटर – 50 नग व इतर साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे दिनांक 15 ऑक्टोंबर 2025 रोजी पोलीत ब्युरो सदस्य, केंद्रीय समिती सदस्य, प्रवक्ता-सिपीआय माओवादी तसेच सचिव-केंद्रीय रिजनल ब्युरो मल्लोजुला वेनुगोपाल राव ऊर्फ भुपती ऊर्फ सोनू याच्यासह एकूण 61 माओवाद्यांनी 54 अग्निशस्त्रांसह मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आत्मसमर्पण केल्यामुळे गडचिरोली आणि संपूर्ण दंडकारण्य विभागातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसलेला होता. गडचिरोली जिल्ह्रातील माओवादी चळवळ संपुष्टात येण्याच्या मार्गावर आली असून भूपतीच्या आत्मसमर्पणानंतर देशभरात एकूण 940 माओवादी सदस्यांनी 569 शस्त्रांसह आत्मसमर्पण केले आहे.
सदर कार्यक्रमाप्रसंगी उप-महानिरीक्षक (अभियान) सिआरपीएफ श्री. अजय कुमार शर्मा, पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. नीलोत्पल, कमांडंट 192 बटा. सिआरपीएफ श्री. परविंदर सिंग, स्टाफ ऑफीसर उप-महानिरीक्षक सिआरपीएफ कार्या. श्री. चंचल परवाना, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., सहाय्यक पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे तसेच पोलीस उप-अधीक्षक (अभियान) श्री. विशाल नागरगोजे हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष अभियान पथक, पोलीस मुख्यालय तसेच सर्व शाखांचे अधिकारी व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.


