चंद्रपूर:- सरदार पटेल महाविद्यालयातील कार्यरत अयोग्य दक्षता समिती आणि मास्मो केअर आयुर्वेदिक रिसर्च फाउंडेशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात एकदिवसीय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच उपस्थित नागरिक अशा एकूण 72 व्यक्तींनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली. शिबिरामध्ये विविध आरोग्यविषयक तपासण्या करून तज्ञ डॉक्टरांद्वारे आरोग्य आणि आहार विषयक मार्गदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे सचिव प्रशांत पोटदुखे, प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर तसेच उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेटीवार, आरोग्य दक्षता समिती प्रमुख डॉ.सतीश कन्नाके यांनी आपली उपस्थिती दर्शविली व आरोग्य तपासणी करून घेतली. या प्रसंगी आरोग्य दक्षता समितीचे सदस्य डॉ. सुनीता बनसोड, डॉ. सपना वेगिनवार, डॉ. सुनील चिकटे, डॉ. धनराज मुरकुटे, डॉ. अमोल ज. कुटेमाटे, डॉ. आशा सोनी व शिक्षकेतर कर्मचारी राजेश इंगोले, सचिन देशमुख यांनी सहकार्य केले.
सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार, कार्याध्यक्ष आ. किशोर जोरगेवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सगुणाताई तलांडी, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, कोषाध्यक्ष संदीप गड्डमवार, सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्यकारी सदस्य, राकेश पटेल, सुरेश पोटदुखे, जिनेश पटेल, यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल महाविद्यालयाचे कौतुक केले .
