Chandrapur News : चंद्रपुरात २ नोव्हेंबरला रंगणार विकसित भारत युवा संसद २०२६–२७!

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
विद्यार्थ्यांना आपले विचार मांडण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. चंद्रपुरातील सरदार पटेल महाविद्यालयात २ नोव्हेंबर २०२६ रोजी विकसित भारत युवा संसद २०२६–२७ चे आयोजन करण्यात आले आहे. या युवा संसदेचा मुख्य विषय 'One Nation – One Election' अर्थात 'एक राष्ट्र – एक निवडणूक' हा असणार आहे.


सकाळी १० वाजता सरदार पटेल महाविद्यालयातील अब्दुल शफी सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे. या उपक्रमात विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजना अर्थात NSS स्वयंसेवकांना सहभागी होता येणार आहे. विशेष म्हणजे, सहभागी विद्यार्थ्यांना मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या तीन भाषांपैकी कोणत्याही एका भाषेत तीन मिनिटांचे भाषण सादर करता येणार आहे. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होण्याचे आवाहन प्राचार्य. डॉ. प्रमोद काटकर यांनी केले आहे.

नोंदणी लिंक:-