Chandrapur police : दोन सराईत गुन्हेगार चंद्रपूर जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार

Bhairav Diwase

चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना सहा महिन्यांसाठी हद्दपार केले आहे.


अशफाक मस्तान कुरेशी, वय ४३ वर्षे, रा. गोंडपिपरी आणि सुंदरसिंग उर्फ सुलविंदरसिंग तेजासिंग डांगी, वय २३ वर्षे, रा. जोगापूर अशी हद्दपार करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.


या दोघांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५६ (अ) आणि (ब) अन्वये गोंडपिपरी पोलिसांनी हद्दपारीचे प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर केले होते. या प्रस्तावांना मंजुरी देत उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी दोघांनाही सहा महिन्यांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गोंडपिपरी पोलिसांनी आदेश बजावून कायदेशीर कारवाई पूर्ण केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा गोंडपिपरी पोलिसांनी दिला आहे.

सदरची धडक कारवाई आयुष नोपाणी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, ईश्वर कातकडे अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर, सत्यजीत आमले उपविभागीय पोलीस अधिकारी मुल यांचे मार्गदर्शनात पार पाडण्यात आली आहे.