Top News

फिट इंडिया अंतर्गत सक्षम भारत अभियान.

Bhairav Diwase. Sep 27, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- चिंतामणी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन बल्लारपूर च्या अंतर्गत चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स, चिंतामणी महाविद्यालय व चिंतामणी कॉलेज ऑफ कामर्स पोंभुर्णा येथे फिट इंडिया अभियानाच्या अंतर्गत "सुदृढ़ भारत, नया भारत" या संकल्पनेवार दिनांक 23 आणि 24 सप्टेंबर 2020 रोजी महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने महाविद्यालयातील प्राध्यापक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांना योगासनाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एन. एच. पठाण सर, डॉक्टर सुधीर हुंगे सर, डॉक्टर टि. एफ. गुल्हाने सर त्याचप्रमाणे शारीरिक शिक्षक निदेशक प्राध्यापक संतोष कुमार शर्मा, प्राध्यापक शैलेंद्र गिरीपुंजे, प्राध्यापक संघपाल नारनवरे हे उपस्थित होते. जगावर आलेल्या covid-19 या संकटाचा सामना करण्यासाठी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व सुदृढ जीवन जगण्यासाठी आपल्या जीवनामध्ये योगासनाचे काय महत्त्व आहे ते पटवून देण्यात आले. हा कार्यक्रम शासनाच्या नियमावलीप्रमाणे फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करून साजरा करण्यात आला. महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे शासनाच्या आदेशानुसार व विद्यापीठाच्या नियमानुसार विशिष्ट अंतर ठेऊन कार्य पार पडत आहे.महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे ऑक्सिजन मीटरद्वारे ऑक्सिजन लेवल व इंफ्रारेड थर्मामीटर द्वारे शरीरातील टेम्परेचर चे मोजमाप नित्यनियमाने महाविद्यालयांमध्ये होत आहे.
कोविड-19 यासारख्या जागतिक महामारीचा सामना करण्यासाठी आपण स्वतः त्याचा सामना ठाम पणे योगासनातील प्राणायाम, कपालभाती व शारीरिक कवायतीच्या माध्यमातून कसा करु शकतो हे प्रा.संतोषकुमार शर्मा सर यांनी प्रात्यक्षिका द्वारे समजावून सांगितले. या कार्यक्रमात माननीय पाहूण्यांनी आपआपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने