चंद्रपूर:- वरोरा येथे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात गणपती बाप्पाची विधिवत स्थापना करण्यात आली आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते पारंपरिक पद्धतीने पूजा-अर्चा करून बाप्पाचे स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यालयातील वातावरण मंगलमय आणि भक्तिमय झाले होते. या मंगलमय प्रसंगी त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय, मानस धानोरकर आणि पार्थ धानोरकर हे देखील उपस्थित होते.
या कौटुंबिक सोहळ्यामुळे कार्यालयात एक वेगळाच उत्साह संचारला होता. यानिमित्ताने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आणि बाप्पा सर्वांचे विघ्न दूर करो, अशी प्रार्थना केली.