Fire News : संजय फ्लेम गॅस एजन्सीच्या गोदाम परिसरात एका सिलेंडरला आग?

Bhairav Diwase
चंद्रपूर:- आकापूर एमआयडीसी, मुल परिसरातील संजय फ्लेम गॅस एजन्सीच्या गोदामात आज सकाळी 8:30 एक एका सिलेंडरला आग‌ लागली. या घटनेत सहा जण जखमी झाले आहे. सर्व जखमींना तातडीने खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कामगार हे संजय फ्लेम गॅस एजन्सीच्या गोडाऊन मधून सिलेंडर बाहेर काढत असताना सिलेंडर खाली पडला, त्यामुळेच आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या आगीत सहा जण जखमी झाले आहे.


या आगीत श्रीचंद अर्जुनराम बिश्नोई, श्रीराम भगीरथ बिश्नोई, कैलास भगीरथ बिश्नोई, रमेश मोहनराम बिश्नोई, महिंद्रा रामरख बिश्नोई, रतीराम हनुमान बिश्नोई हे जखमी झाले आहेत.


घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दलाच्या गाडी घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. पुढील तपास मुल स्टेशनचे ठाणेदार राठोड यांच्या मार्गदर्शनात API सुबोध वंजारी हे करीत आहेत.