Click Here...👇👇👇

मुलांसमोर वडिलांवर कुऱ्हाडीने वार. #Chandrapur

Bhairav Diwase
1 minute read

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- दि. 7 ऑगस्टला शामनगर परिसरात क्षुल्लक वादावरून 42 वर्षीय इसमास पती-पत्नीने कुऱ्हाडीने वार करीत गंभीर जखमी केले. #Chandrapur #Adharnewsnetwork
42 वर्षीय गुलाब दडमल असे जखमीचे नाव तर आरोपी शामनगर परिसरात राहणारे 35 वर्षीय छोटू सुकुमार मंडल व निशा छोटू मंडल असे आहे.
     दुपारी 1 वाजेदरम्यान गुलाब दडमल हे घरी जात असताना आरोपी छोटू ने त्यांच्या जातीचा उल्लेख करीत आवाज देत त्यांची कॉलर पकडली, यावर दडमल यांनी मला असं बोलू नको माझ्या घरी पाहुणे आले आहे" असे म्हटल्यावर छोटू ची पत्नी निशा ने हातात दगड घेत दडमल यांच्या गालावर मारला, भांडणाचा आवाज ऐकताच नागरिकांनी व दडमल यांच्या मुलानी भांडण सोडवले व वडिलांना घरी घेऊन जाऊ लागला मात्र आरोपी छोटू याने हातात कुऱ्हाड घेत दडमल यांच्या कपाळावर व डोक्यावर कुऱ्हाडीने वार केला.
अचानक झालेल्या कुऱ्हाडीच्या प्रहाराने दडमल हे रक्तबंबाळ झाले, त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सदर प्रकरणाची रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली, आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.