Top News

जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांची सावली पंचायत समितीला भेट.

कोरोणाच्या पार्श्वभूमीवर घेतला स्थितीचा आढावा.
Bhairav Diwase.   April 29, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली: कोरोणाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण भारतात संचारबंदी लागू असल्याने नागरिकांच्या सेवेसाठी सरकारी कार्यालय आणि तत्संबंधी अत्यावश्यक संस्था सुरू आहेत. त्यामुळे आज जि. प. अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी सावली पंचायत समितीला सदिच्छा भेट दिली.
कोरोणा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्यरत यंत्रणांकडून कशाप्रकारे कार्य चालू आहेत आणि पंचायत समिती स्तरावरून होत असलेल्या विकासकामांची स्थिती काय आहे यासंबंधी त्यांनी उपस्थित अधिकार्‍यांकडुन आढावा घेतला.
ज्यामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सुरू असलेल्या आणि रखडलेल्या कामांविषयी अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. तसेच लघुसिंचन अंतर्गत करण्यात येत असलेले विविध बांधकाम व दुरुस्ती यांचीही स्थिती आणि सद्यस्थितीत काय उपाययोजना सुरू आहेत याविषयी अधिकार्‍यांना विचारणा करत अनेक सूचना त्यांनी केल्या. सावली तालुक्यात काही गावे पाणीटंचाईग्रस्त आहेत यासंदर्भात देखिल त्यांनी अधिकार्‍यांशी चर्चा केली. आणि मनरेगाचे कामे करत असतांना सोशल डिस्टेंसिंगचे काटेकोरपणे पालन करूनचं कामे पार पाडा अशी सूचना त्यांनी  अधिकार्‍यांना दिली. आणि या महामारीचे वाढते प्रादुर्भाव लक्षात घेऊन आपणही सुरक्षितता राखूनचं आरोग्याची काळजी घेत काम करा. असे निर्देश त्यांनी यावेळी अधिकार्‍यांना दिले. 
याप्रसंगी सावली पं. स. संवर्ग विकास अधिकारी अमोल भोसले, अतिरिक्त संवर्ग विकास अधिकारी निखिल गावळे उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने