Top News

कोरोना विषाणूच्या जनजागृती करण्यासाठी चंद्रपुरात पोलिसांचा रूट मार्च.

शहरातील विविध भागात फिरून लोकांना जागृत आणि सजग करण्याचा प्रयत्न.
Bhairav Diwase.    April 29, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा आजपर्यंत सुरक्षित असला तरी लगतच्या यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. नागपूर-यवतमाळ आणि भंडारा हे तिन्ही जिल्हे कोरोनाप्रभावित असल्यानं मधात सापडलेल्या चंद्रपूरला सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न प्रशासनानं चालवले आहेत. याचाच एक भाग म्हणून पोलीस विभागानं आज शहरात रूट मार्च काढला. शहरातील विविध भागात फिरून लोकांना जागृत आणि सजग करण्याचा प्रयत्न यातून केला गेला.

टाळेबंदी शिथिल केल्याचा गैरफायदा घेत नागरिक शहरात गर्दी करू लागल्याचं चित्र निर्माण झाल्यानं यावर अंकुश लावण्यासाठी पोलिसांनी हा रूट मार्च काढला. यावेळी ठिकठिकाणी लोकांनी फुलं उधळून पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी उभं राहून पोलिसांवर फुलांचा वर्षाव केला आणि त्यांचे आभार मानले. चंद्रपूर जिल्हा आजतागायत कोरोनामुक्त आहे. तो तसाच राहावा, यासाठी सर्वपरी प्रयत्न जिल्हा प्रशासन घेत आहे. जीवनावश्यक साहित्याची दुकानं आणि सोबतच कृषी, बांधकामसंबंधी प्रतिष्ठानं खुली करण्यात आली आहेत. टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आलेली असताना याचा विपर्यास करून लोक अनावश्यक गर्दी करून रस्त्यांवर वाहनं फिरवीत आहेत. पोलीस अशा वाहनचालकांवर कारवाई करीत असली तरी त्याला पूर्णपणे आळा बसावा, यासाठी पोलिसांनी आज रूट मार्च काढला. ही कवायत आणखी तीन-चार दिवस कायम राहणार.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने