Top News

चंद्रपूर जिल्ह्यात सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मास्क न वापरल्याबद्दल ७८ हजारांचा दंड वसूल.

सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १७ तर तोंडाला मास्क न लावणाऱ्या ३८६ लोकांवर चंद्रपूर महापालिकेने दंडात्मक कारवाई.
Bhairav Diwase.    April 28, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपर
चंद्रपूर:- करोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असताना सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या १७ तर तोंडाला मास्क न लावणाऱ्या ३८६ लोकांवर चंद्रपूर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या या लोकांकडून तब्बल ७८ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनापासून बचावासाठी मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत शासनाकडून स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत व त्यानुसार मनपातर्फेही मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, तरीही शहरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणारे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणारे लोक आढळून येत असल्याने मनपाकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
         कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरीकांना घरातच राहण्याचे वारंवार आवाहन करत आहे. शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काही नागरिक मास्कशिवाय विनाकरण रस्त्यावर फिरत असल्याने तसेच सार्वजनीक ठिकाणी थुंकत असल्याने थुंकीच्या माध्यमातून कोरोनाच्या फैलावाची शक्यता आहे. अशा नागरिकांवर पोलीस कारवाईही केली जात आहे. मात्र, तरीही घराबाहेर पडण्याचे नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने पूर्वपरवानगी घेऊन घराबाहेर पडणाऱ्यांनाही मास्क लावणे सक्तीचे केले आहे. त्यानुसार आता चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरात मास्कशिवाय फिरणाऱ्या व थुंकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईदरम्यान, गेल्या पाच दिवसांत ३८६ नागरिकांवर कारवाई करून ७८ हजार ५०० रुपयांचा एकूण दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय मास्क न घातलेल्या व्यावसायीकांवरही कारवाई करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान मास्क लावण्याची समज देण्यात येऊन प्रत्येक नागरिकाला ३ मास्कसुद्धा देण्यात येत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने