Click Here...👇👇👇

आजपासून सर्व नागरिकांनी कापडी मास्क वापरावा : जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार.

Bhairav Diwase
मेडिकल वगळता किराणा दुकाने फक्त ३ वाजेपर्यत सुरु राहतील.
   Bhairav Diwase.      April 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे, डोंगरहळदी तुकुम
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील एकही पॉझिटिव्ह कोरोना ग्रस्त रूग्ण नाही. त्यामुळे लगतच्या सर्व जिल्ह्याच्या सीमा कडेकोट बंद करण्यात येत आहे. १४ एप्रिल पर्यंत आता रस्त्यावरची गर्दी अतिशय कमी झाली पाहिजे. यासाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने दुपारी फक्त तीन वाजेपर्यंत उघडी ठेवली जातील. रस्त्यावर दिसणाऱ्यांना आता सक्तीने  पोलीस ताब्यात घेतील. त्यामुळे पुढील काही दिवस नागरिकांनी सहकार्य करावे असे आव्हान चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांनी आज केले आहे. 
 चंद्रपूर व जिल्ह्यातील अन्य शहरांतील तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी १४ एप्रिल  पर्यंत आता घराबाहेर पडणे बंद करावेत. कोरोना विषाणू महाराष्ट्र राज्यात, देशात नव्हे तर संपूर्ण जगात झपाट्याने पसरत आहे. पुढील काही दिवस अतिशय जबाबदारीने वागावे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
   जिल्हाधिकाऱ्यांचे आजचे आदेश.
 १) नागपूर, यवतमाळ, गोंदीया जिल्हयाशी संपर्क नाही
२) जिल्ह्याच्या व राज्याच्या सर्व सीमा सील बंद
३) जिल्ह्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण नाही
४)जिल्हा प्रशासनाने बँक ऑफ इंडियात खाते उघडले ; मदतीचे आवाहन
५) रस्त्यावर विनाकारण दिसाल तर पोलीस कारवाई होईल
६) आज पासून सक्तीमध्ये वाढ ;जीवनावश्यक दुकाने ३पर्यत
७) औषधी दुकाने व घरपोच पार्सल सेवा देणाऱ्या हॉटेलची किचन उघडी
८)अनावश्यक फिरणाऱ्या 91 नागरिकांवर पोलीस कारवाई
९)180 वाहने पोलिसांकडून जप्त ; खरेदीसाठी पायी निघा
१०) बँकेतील व्यवहार शक्य असेल तर पुढे ढकलण्याचे आवाहन
११) जिल्ह्यातून अन्य ठिकाणी जाणाऱ्या लोकांची माहिती प्रशासनाला द्या
१२) शेवटचे दहा दिवस नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन