सर्व जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या असून आत मध्ये प्रवेश दिला जाणार नाही, व बाहेर देखील जाण्याची परवानगी दिली जाणार नाही.:- जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार

Bhairav Diwase
चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्व सीमा सील.
      Bhairav Diwase.    April 11, 2020 
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी)वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या वेगवेगळ्या संपर्क क्रमांकाचा वापर करावा व त्याद्वारे योग्य ती माहिती मिळवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व मोबाईल ऑपरेटर यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत एसएमएस'द्वारे संपर्क क्रमांक पोहोचत असून आवश्यक मदतीसाठी या संपर्क क्रमांकांवर मदत घेण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. अन्य जिल्ह्यातील नागरिकांनी पुढील आदेशापर्यंत शेल्टर होम मध्येच राहावे. आपल्याला देण्यात येत असलेल्या सुविधा व निवारा व भोजना संदर्भात जिल्हा प्रशासन रोज आढावा घेत असून त्यामध्ये कुठलीही कमतरता जाणवणार नाही ,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय जिल्ह्याबाहेर राहणाऱ्या नागरिकांना ही त्यांनी विनंती केली आहे की, पुढील आदेश होईपर्यंत जिल्ह्यात येण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रयत्न करू नये. सर्व जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या असून आत मध्ये प्रवेश दिला जाणार नाही व बाहेर देखील जाण्याची परवानगी दिली जाणार नाही, हे नागरिकांनी लक्षात घ्यावे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.